36 Ratings
4.69
Language
Marathi
Category
Personal Development
Length
19T 31min

Sampurna Swabodh Dnyaneshawari

Author: Padmakar Deshpande Narrator: Datta Sardeshmukh, Suvarna Bodas Audiobook

आजच्या भाषेतील ज्ञानेश्वरी
मराठीतील ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या जेवढ्या आवृत्त्या आणि प्रती प्रसिद्ध झाल्या तितक्या दुसऱ्या कोणत्याही ग्रंथाच्या प्रकाशित झाल्या नसतील. एवढे असूनही मूळ ज्ञानेश्वरी जाणून घेणे होत नाही. प्रवचन, कीर्तनातून काही ठराविक ओव्या कानावर पडतात इतकेच. त्यामुळे संपूर्ण ज्ञानेश्वरी जाणून घेण्यासाठी 'स्वबोध ज्ञानेश्वरी' निर्माण केली आहे. यात ज्ञानेश्वरी बाहेरचे काही नाही आणि मूळ लेखनातील काही कमी देखिल केलेले नाही. आजच्या भाषेचे समग्र ज्ञानेश्वरी जाणण्याचा हा एक सुलभ मार्ग आहे. यातून श्रोत्यांना आनंद, समाधान मिळणार आहे. केवळ ऐकून सुख शांती अनुभवास येणार आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी जाणणे आजच्या तरूण वर्गाला देखिल सुलभ होणार आहे. आजच्या जीवनातील समस्या, ताणतणाव, धकाधकी यातून दिलासा मिळणार आहे. आपण फक्त एकच करायचे, स्वतः ज्ञानेश्वर आपणास ज्ञानेश्वरी सांगत आहेत असा विचार करून स्वबोध ज्ञानेश्वरी ऐकायची आहे. त्यातून निखळ आनंदाची प्राप्ती होईल हे ज्ञानदेवांचे वचन आहे. ऐकताच सुखप्राप्ती करून देणारा हा ठेवा आपण प्राप्त करू या आणि इतरांनाही या आनंदात सहभागी करून घेऊ या !© Padmakar Deshpande

© 2021 Zankar (Audiobook) ISBN: 9789390793600