Step into an infinite world of stories
3
Lyric Poetry & Drama
मराठी काव्यात दिसून येणारी रूक्षता, नीरसता, दुर्बोधता आणि कल्पनाशून्यता मनाला सारखी टोचत होती. याऊलट उर्दू शायरीतील मोहिनी मनाला बेधुंद करीत होती. मराठी काव्याला जर काही वेगळे रूप दिले नाही; त्यात जर जीवनाची धुंदी दिसली नाही आणि अत्यंत आकर्षक अशा सौंदर्याचा आविष्कार जर या काव्यात आढळणार नाही तर उर्दू शायरीची ‘नखरेल नार’ आमचा काव्यरूप संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही अशी मला साधार भीती वाटत होती. ‘चौदहवी का चाँद’ किंवा ‘अब क्या मिसाल दू’ सारख्या काव्यपंक्तीखेरीज आज कोणत्या काव्यपंक्ती आमच्या तरूण पिढीच्या जिभेवर आहेत? तरूण पिढीला उगीच नावे ठेवणे मला पसंत नाही. वरील काव्ये उत्तान शृंगाराची खात्रीने नाहीत आणि आमची तरूण पिढी मुळीच बहकलेली नाही. या तरूण मनाला ज्या सौंदर्याची तहान लागली आहे ती भागवण्याचे सामर्थ्य आमच्या काव्यात नाही एवढेच मी म्हणेन. जेष्ठ गझलकार भाऊसाहेब पाटणकर यांचा गझल संग्रह.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789390172498
Release date
Ebook: 6 May 2021
Tags
English
India