Step into an infinite world of stories
4
Biographies
महाराष्ट्राच्या 'आयपीएस अधिकारी मीरा चढ्ढा-बोरवणकर यांच्याकडे तरुण मुली आणि महिला ह्यांना सांगाण्यासाठी एक कथा आहे. ही कथा महत्वाची, प्रामाणिक आगि खूपच प्रसंगोचित आहे. आपली स्वप्नं साकार होताना बघणाऱ्या आणि समृद्ध जीवन व्यतीत करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक तरुणीने ही कथा वाचायलाच हवी. ही कथा आहे, पंजाबच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होऊन पुरुषांचं वर्चस्व असलेल्या पोलीसखात्यात टिकून राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका गुलीची. ती फक्त प्रयत्नच करीत राहिली, का तिची भरभराटही झाली? स्वतःच्या करिअरमधले रंजक असे प्रसंग सांगतानाच मीरां त्या प्रसंगातून त्यांना कोणते घडे शिकायला मिळाले, ह्याबद्दलही मार्गदर्शन करतात. आयुष्य आणि करिअरला योग्य दिशा देण्यासाठी तरुणांनी कृती कशी करावी, याचे काही महत्वपूर्ण मुद्देही त्या मांडतात. तरुणांमधील नेतृत्वकौशल्य वाढीला लागावं, असं त्यांना वाटतं. म्हणूनच, पोलीस अधिकारी मीरां यांनी दंडुक्याच्या जोडीला हातात लेखणीही घेण्याचा निर्णय घेतला.
© 2025 Abhivachan (Audiobook): 9789386455062
Release date
Audiobook: 10 December 2025
English
India
