Step into an infinite world of stories
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही नाट्यपूर्ण घटना राज्याच्या राजकारणात घडल्या. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या चौकटीत बसणार नाहीत अशा ज्या घडामोडी त्या ठराविक काळात घडल्या, त्यांनी इथल्या राजकारणावर कायमचा प्रभाव टाकला आहे. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झाले, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सहभागी झाले. भाजपने अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यासाठी नकार दिल्याने शिवसेनेने आपला मार्ग निवडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचे पक्के केले. या निमित्ताने आणखी एक मूलभूत विषय चर्चेला आला, तो म्हणजे भारतातलं आघाड्यांचं राजकारण, त्याचे राजकीय व्यवस्थेवर होणारे परिणाम आणि त्याचं भविष्य! याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत… चला तर मग!
Release date
Audiobook: 22 March 2022
English
India