Step into an infinite world of stories
Non-Fiction
मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) या शास्त्रज्ञ होत्या. इ.स. १९०३ साली पदार्थ विज्ञानातील (भौतिकशास्त्र) संशोधनामुळे व इ.स. १९११ साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी क्युरी यांच्याकडे जातो.वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरुन पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते. अशा या महान शास्त्रज्ञाचे जीवन जाणून घ्या...
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789369319404
Release date
Audiobook: 1 November 2020
English
India