4.4
1 of 1
Religion & Spirituality
`कैवल्यवारी` म्हणजे पंढरीच्या वारीचा सांगावा देणारा एक सांगीतिक श्राव्यानुभव आहे. ग्यानबा-तुकाराम असा गजर करत वारी देहू-आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करते, तेव्हा तिचं वाटेतील विविध टप्प्यांतील दर्शन घडविणारा हा सांगीतिक आविष्कार. भक्तीरसानं ओथंबलेल्या आपल्या स्वरांतून यात सहभाग घेतला आहे, पं. सुरेश वाडकर, पं. शौनक अभिषेकी, पं. आनंद भाटे, राहुल देशपांडे, अवधूत गांधी, कार्तिकी गायकवाड, शमिका भिडे अशा दिग्गज गायकांनी. संगीतकार पं. कल्याणजी गायकवाड यांच्या चालींना संगीत संयोजन लाभले आहे कमलेश भडकमकर यांचे. आषाढी वारीच्या निमित्ताने ही सारी संकल्पना ज्यांनी साकार केली ते ज्येष्ठ पत्रकार, संवादक व संत साहित्याचे अभ्यासक राजेंद्र हुंजे आणि ज्यांच्या शब्दांतून हा प्रकल्प आकारास आल्या त्या गीतकार सौ. वर्षा हुंजे यांच्यासमवेत संतोष देशपांडे यांची रंगलेली ही संवादात्मक, सांगीतिक कैवल्यवारी! श्रिया क्रिएशन्सच्या सौजन्याने ही भक्तीमैफल आपणापर्यंत पोहोचते आहे.
Release date
Audiobook: 6 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Heartwarming
Mind-blowing
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 28
Kamlesh Subhash
6 Jul 2022
ठेऊनी कटीवरी हात | राउळी पाही तो वाट ||भक्तांच्या भक्तीची जाण | जगताची माऊली ||#विठूमाऊली 🙏
swati
9 Jul 2022
कैवल्य वारी सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!! मला घरबसल्या वारीचा अनुभव घेता आला. वारीला जाता येणं हे प्रत्येकाचं भाग्यच आहे. पण तुम्ही जी आज वारी घडवली त्यासाठी धन्यवाद हा शब्द पुरेसा नाही. तुमच्या रूपाने माऊलीचे दर्शन घडले वारी कळाली. विठुरायाच्या वारीचा हा आनंद सोहळा बघण्याची संधी मला मिळावी अशी प्रार्थना करते.राम कृष्ण हरी!!!
vicky
16 Jan 2023
वृक्ष वली!! आम्ही सोयरी!!*जय हारी विठ्ठल*
Shubhangi
13 Jul 2022
अत्युत्तम
somnath
7 Jul 2022
अप्रतिम माऊली🙏
Pooja Kailas
10 Jul 2022
वाह वाह किती सुंदर ❣️
Aparna
25 Jul 2022
Excellent writing and music took me in ecstasy
Ankush
29 Jun 2023
अप्रतिम अनुभव..!!
English
India