Step into an infinite world of stories
2.5
Short stories
सुनीता झाडे यांचे 'रसिया' हे पुस्तक लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे काव्यात्म ललितबंध असले, तरी हे वैशिष्ट्य केवळ आकृतीबंधाच्या संरचनेनुसार सांगता येते. पुस्तकातील 'रसियां'ची मंडणी आणि आशयाची सुत्रे तपशीलासह तपासली तर स्त्रीत्वाच्या भंगलेल्या किंवा अपूर्ण, अतृप्त प्रेमाच्या या काव्यात्म सत्यकथा असल्याचे सिध्द होते. या ४० कथांचे एकच सूत्र असल्याने या पुस्तकाला काव्यात्म लघुकादंबरी सुध्दा म्हणता येणे शक्य आहे. सुनीता झाडे यांची 'रसिया' ही काव्यात्म आत्मकथा म्हणावी का? असाही प्रश्न निर्माण होतो. 'रसिया'तील अनेक स्त्रियांच्या त्यांच्या त्यांच्या रसियाच्या अनुभूती लक्षात घेतल्या, तर काही स्त्रियांचे प्रेमाच्या विसंवादी वर्तुळातील मर्यादित काव्यात्म, चरित्रही असल्याचे मत मांडता येऊ शकेल. अभिवाचन: नेहा लिमये
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422066
Release date
Audiobook: 19 November 2021
Tags
English
India