Step into an infinite world of stories
रशिया आणि युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे सध्या गेल्या महिनाभरापासून जगभरचं वातावरण ढवळून निघालंय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गेली काही वर्षी युक्रेनवर हल्ला करण्याची जी तयारी चालवली होती, तिला अखेर गेल्या महिन्यात त्यांनी मूर्त रूप दिलं. युक्रेनवर थेट हल्ला चढवत रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असलेलं कीव्ह शहर ताब्यात घेतलं. हे युद्ध सुरु असताना आणखी एका संघर्षाची चर्चा दबक्या पावलांनी समोर येऊ लागली, ती म्हणजे चीन आणि तैवान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या संघर्षाची. जगभरातील विस्तारवादी नेते आपापल्या दरडीवर असलेले देश ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दीर्घकाळापासून आहेत. पुतीन यांनी त्याची सुरुवात केली आहे, आणि आता इतर नेतेही त्यांचीच री ओढतील अशा आशयाची चर्चा होऊ लागली. या निमित्ताने, चीन आणि तैवान या दोन देशांत नेमका काय संघर्ष सुरु आहे, आणि येत्या काळात चीन तैवानवर हल्ला करेल का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग…
Release date
Audiobook: 17 March 2022
English
India