Step into an infinite world of stories
4.3
Personal Development
रणनीती आणि नेतृत्व यासंबंधीचा एक अभिजात ग्रंथ सुन त्झू यांचे "द आर्ट ऑफ वॉर" हा रणनीती आणि युद्ध यांच्यावरील एक कालातीत आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथ आहे ज्याने शेकडो वर्षे वाचकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेला हा चिनी अभिजात ग्रंथ त्या काळाइतकाच आजही लागू होतो, जो संघर्षाचे स्वरूप आणि विजय मिळवण्याची कला याबाबत विद्वत्तापूर्ण अंतर्दृष्टी देतो. सुन त्झू यांची शिकवण केवळ लष्करी डावपेचांच्या पलिकडे जाते; ती मानवी मनाचे शहाणपण आणि मानवी वर्तणुकीचे गतिशास्त्र यांनाही सामावून घेते. ती आयुष्यातील आव्हाने शहाणपण आणि दूरदृष्टी यांच्या साहाय्याने पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठीची मार्गदर्शक आहे. हे ऑडिओबुक: • संघर्षाप्रति एक सर्वांगीण दृष्टिकोन सादर करते, ज्यामध्ये स्वतःला, आपल्या शत्रूला आणि ज्यामध्ये आपण काम करतो त्या पर्यावरणाला समजून घेण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे; • आंतरवैयक्तिक किंवा व्यवसायातील झगडे सोडवायला मदत करते आणि सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परिस्थितींमध्ये कसे यशस्वी व्हायचे यासाठी प्रेरणा आणि सल्ला मिळण्याचा स्रोत बनू शकते; • मानवी परस्परक्रियांमधील गुंतागुंतींबद्दल बोलते, आणि वाटाघाटी, मुत्सद्देगिरी आणि निर्णय घेणे यांच्यातील बारकाव्यांवर प्रकाश टाकते; • धोरणात्मक विचार, जुळवून घेण्याची क्षमता आणि दीर्घकालीन ध्येयांसाठी संयम आणि चिकाटीने प्रयत्न करणे यांचे समर्थन करते; • यशाकडे घेऊन जाणाऱ्या आणि रोजच्या दिवसाच्या लढायांमध्ये किंवा वैयक्तिक आव्हानांमध्ये आपल्याला लाभदायक ठरतील अशा रणनीती, डावपेच आणि अंतर्दृष्टी उलगडून दाखवते. त्याच्या मुद्देसूद परंतु विद्वत्तापूर्ण सूत्रांसह, “द आर्ट ऑफ वॉर” ही एक उत्कृष्ट साहित्यकृती आहे जी काळ, संस्कृती आणि विषयाच्या पलिकडे जाते. तो पांडित्याचा असा खजिना आहे जो अनेक पिढ्यांपासून, लष्करी रणनीतीज्ञांपासून ते आघाडीच्या व्यावसायिकांपर्यंत, राजकारण्यांपासून ते तत्त्वज्ञान्यांपर्यंत अनेक लोकांना प्रेरक ठरत आला आहे. सुन त्झू यांचा ग्रंथ हा कालातीत अभिजात ग्रंथ आहे जो मानवी स्थितीच्या जटिलता आणि कोणत्याही उद्योगात विजय मिळवण्याची कला यांच्याबाबत अमूल्य अंतर्दृष्टी देऊ करतो.
Original title: The Art of War ©2023 ABP Publishing. Translation by Priyanka Ganage, ℗2023 ABP Publishing
© 2023 ABP Publishing (Audiobook): 9781628616453
Release date
Audiobook: 1 August 2023
Tags
English
India