Step into an infinite world of stories
।। प्रकाशकीय ।। स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृती जाळण्यापासून ते अगदी आत्ताच्या काळात जयपूर येथील उच्च न्यायालयाच्या आवारात असलेली महर्षी मनूंची मूर्ती हलवण्याच्या वादापर्यन्त महर्षी मन्, मनुस्मृती व मनुप्रतिपादित मानव जीवनविषयक विचारांचा विरोध हा अव्याहतपणे या ना त्या कारणावरून नेहमीच होत आलेला आहे. हा तथाकथित "मनुवाद" शब्द राजकीय, जातीय, धार्मिक, सर्वच बाबतीत ज्याला जसा वाटेल तसा व जसा लाभ हवा तसा वापरला जात आहे. पण मनूचा विरोध करणाऱ्यांना देखील मनू किती समजला आहे ? व ज्ञात आहे ? हा एक प्रश्नच आहे. प्रस्थापित जन्मगत जाती व्यवस्था, विषमता, स्त्रिया व दलित, शूद्रांवरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध बंड करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्वांना जबाबदार म्हणून तत्कालिन "मनुस्मृतीचे" दहन केले व या सर्वं अत्याचारांनी पिडित जनतेस एकत्रित करून त्यानां मुक्तीचे द्वार उघडे केले. डॉ. आंबेडकरांनी जेव्हा मनूचा विरोध केला तेंव्हा त्यांचा दृष्टिकोण बुद्धिवादी होता. कारण घटना परिषदेमध्ये हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ भाषण करताना त्यांनी मनुस्मृतिचा आधार घेतला हे त्यांच्या बुद्धिवादाचेच लक्षण आहे. सर्व मनुविरोधकांनी मनूचे केवळ एकांगीच चित्रण केलेले दिसते. जे विकृत, भयावह व पूर्वग्रहदूषित आहे. यामुळे न केवळ महर्षी मनूंची प्रतिमा डागाळली जात आहे तर पूर्ण भारतीय, धर्म, संस्कृती, सभ्यता, साहित्य, इतिहास व विशेषतः धर्मशास्त्रांचे विकृत चित्र उभे केले गेले आहे. यामुळे देश विदेशात समस्त मानव वंशात मने कलूशित होतात, भ्रांत कल्पना व धारणांचा प्रसार होतो. धर्मशास्त्रांचा व्यर्थ अपमान होतो व आपल्या गौरवशाली भारतीय संस्कृतीचा -हास होतो. २८ जुलै १९८९ ला राजस्थान उच्च न्यायालयात महर्षी मनूची मूर्ती हलवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या विरुद्ध महर्षी मनूच्या बाजूने मनुप्रतिष्ठा संघर्ष समितीने आपली बाजू मांडली जी न्यायालयाने ग्राह्य घरली व मनू मूर्ती हलविण्याबाबतची याचिका रद केली. महर्षी मन्चे यर्थाथ दर्शन या प्रकरणी न्यायालयात सादर केले गेले, ज्यामुळे महर्षी मनूवर लावलेले सर्व आरोप खोटे कसे आहेत व मूळ मनुस्मृतीत तत्कालीन स्वार्थी लोकांनी भेसळ करून तिचे विकृत रूप कसे प्रचलित केले हे उघड झाले. न्यायालयात सादर केलेल्या युक्तिवादाचा हा अनुवाद जन सामान्यांना महर्षी मनूंचे सत्यदर्शन करणारा ठरेल. म्हणून डॉ. सुरेन्द्रकुमार आचार्य, ज्यांनी मनुस्मृतीचे भाष्य केले आहे आणि मूळ मनुस्मृतीतील झालेली भेसळ प्रकाशात आणली त्यांनीच लिहिलेल्या 'मनु का विरोध क्यों ?' या मूळ हिंदी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद वाचकांपुढे सादर करीत आहोत. मूळ हिन्दी पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. गोविंद घनश्याम मैंदरकर, धाराशिव, यांनी उत्तम शैलीत केला आहे. तसेच हे पुस्तक वाचकांपर्यन्त अत्यल्प दरात पोहाचावे म्हणून महाराष्ट्रातील आर्य समाजच्या सर्वच शाखांनी अधिकाधिक प्रमाणात पुस्तके घेऊन सहकार्य केले म्हणून आम्ही त्यांचे आभारी आहोत. शेवटी मानव संस्कृतीचे आद्य प्रवर्तक महर्षी मनूंची ही शुद्ध प्रतिमा अर्वाचीन मन्, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सादर समर्पण करीत आहोत. महाराष्ट्रातील विचारशील वाचक या पुस्तिकेचे स्वागत करतील. मागील प्रकाशन तपशील मार्गशीर्ष कृष्ण ३ शके १९२१ स्व. प्रा. एकनाथ नाणेकर डिसेंबर ६, १९९८ ( डॉ. आंबेडकर स्मृतिदिन )
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399890
Release date
Audiobook: June 24, 2023
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International