Step into an infinite world of stories
4.5
Biographies
१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने ‘बेअर्ड टेलिव्हिजन’ नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली.बेअर्ड-हॅचिन्सन या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकांसाठीचे पहिले प्रक्षेपण ३० सप्टेंबर १९२९ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त १९ जणांनी! दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या.प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे फेब्रुवारी १९४६ मध्ये निधन झाले. आज दूरचित्रवाणीने आपले आयुष्य व्यापले आहे. त्याच्या जन्मदात्याचे चरित्र नक्कीच ऐकायला हवे...
Release date
Audiobook: 1 September 2020
Tags
English
India