Step into an infinite world of stories
4.4
Biographies
स्टीव्ह जॉब्ज - तंत्रज्ञानाच्या जगामधला सगळ्यात प्रसिध्द जादूगार - हे जग सोडून गेला... पण त्यानं आपल्या अद्भुत कल्पनाशक्तीच्या जोरावर तयार केलेले कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, म्युझिक प्लेअर्स, टॅब्लेट पीसीज हे सर्व या जगाला त्याची आठवण देत राहतील. जगभरातल्या लोकांच्या कल्पनाशक्तीपलीकडची उत्पादनं जॉब्जनं प्रत्यक्षात आणून दाखवली. आपलं आयुष्यच तो एका वेगळ्या विश्र्वात जगला. राजाचा रंक आणि परत रंकाचा राजा असं सनसनाटी आयुष्य जॉब्जच्या वाट्याला आलं. सगळ्यांहून वेगळं आणि अगदी सर्वोत्तम असंच कायम करून दाखवण्यासाठी तो आयुष्यभर धडपडला. कर्करोगानं जॉब्जचं शरीर पोखरून टाकलं, तरी त्याही स्थितीत त्यानं शेवटपर्यंत आपल्या कल्पनांच्या भरार्या मारायचं काम थांबवलं नाही. अशा या हट्टी, जिद्दी, कलाकार तंत्रज्ञाला सलाम करणारी ही रंजक सफर!
Release date
Audiobook: 26 September 2020
Tags
English
India