खेळाचा कंटाळा, त्याच त्या मित्र-मैत्रिणींचा कंटाळा, घराचा कंटाळा, खाण्याचाही कंटाळा! सारा आणि मॅडीला सगळ्याचाच आलाय कंटाळा! मग आई म्हणते एका मस्त जागी जाऊ आपण, तिथं तुमचा कंटाळा होईल छू मंतर! अशी कुठली आहे बरं ही जागा? मॅडी आणि सारा तयार होतील का तिथं जायला? आणि त्यांचा कंटाळा कसा छू मंतर होणार बरं?