Step into an infinite world of stories
4.5
Personal Development
श्रीभगवद्गीता मला समजली नाही असं आपण म्हणूच शकत नाही. आपण तर प्रत्यक्ष अनुभवतो. अहो अर्जुनाचा सगळा रोल आपणच तर करतो की आपल्या आयुष्यामध्ये. आणि जेंव्हा आपण सोडून दुसरं कुणीतरी अर्जुन होऊन आपल्याकडे मदत मागतं तेंव्हा आपण श्रीकृष्णच असल्यासारखे सल्ले देतोच की. म्हणजे श्रीकृष्णाचा रोल सुद्धा आपल्याला समजतोच की! म्हणजे एका रंगमंचावर अर्जुन समजतो तर दुसऱ्या रंगमंचावर कृष्ण समजतो! त्यामुळे प्रश्न भगवद्गीता समजण्याचा नाहीये तर ती उमजण्याचा आहे. आपल्यामधल्या अर्जुनाला आपल्यामधलाच श्रीकृष्ण ज्यावेळी सांभाळेल त्यावेळी गीता खरी उमगेल. कृष्ण आणि अर्जुन हे माझ्या जीवनाच्या एकाच रंगमंचावर समजले म्हणजे गीता उमजली! आणि त्यासाठी श्रीकृष्णार्जुनसंवादे मधील संवाद समजावून घ्यायला हवा.© Dhananjay Ghokle ( DG)
© 2021 Zankar (Audiobook): 9789354374722
Release date
Audiobook: 15 October 2021
Tags
English
India