Deepak
13 Jun 2022
आत्तापर्यंत वाचलेल्या बिसनेस कसा करावा? या धर्तीवरील सर्वोत्तम पुस्तक. दुसऱ्या व्यवसायिकांची उदाहरणे देऊन वाचकाचे कान टोचण्याचे प्रयत्न करणारे अनेक लेखक पाहिले पण स्वतःला आलेल्या अनुभवांच्या जोरावर लिहिलेले आणि फारसा फाफट पसारा न करता नव उद्योजकांना नक्की काय माहिती असणे गरजेचे आहे तेवढ्याच आशयाचा समावेश करून पुस्तक लिहिल्याने याचा दर्जा जागतिक दर्जाचा बनला आहे. कान सोनारानेच टोचावे आणि कसे टोचावे हेही सोनारेच शिकवावे.तसे पाहिले तर वडिलांचा मृत्यू हा अतिशय भावनिक विषय असूनही त्यात इच्छा असूनही फारसे न अडकता पुस्तकाचा विषय काय हे ओळखून तो मुद्दा मुद्दामच लेखकाने थोडक्यात उरकला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस वडिलांबद्दल भरभरून लिहिलेले असताना त्यांचा मृत्यूबद्दल मात्र फारच थोडक्यात लिहिले आहे. खरेतर याठिकाणी भावनिक शब्द वापरून वाचकांना खिळवून ठेवण्याची मोठी संधी समोर असतानाही पुस्तक सध्या कोणत्या वळणावर आहे हे ओळखून लेखकाने आपल्या भावानांना आवर घातल्याचे दिसते. हे पुस्तक केवळ नव-उद्योजकांसाठीच नव्हे तर नोकरदार, गृहिणी, अगदी व्यवसायात यशाच्या अत्युच्च शिखरावर असणाऱ्यांसाठी गीता म्हणून काम..