Step into an infinite world of stories
ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्यांच्याबरोबर केलेला संवाद होता. सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा. तरूणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता. त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणार नव्हतं म्हणून सॉक्रेटिस तरूण मुलांना बिघडवतोय, असे त्यावेळेच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले इतकेच नव्हे तर हेमलॉक नावचं विषही प्यायला दिलं. रिपब्लिक ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोने न्याय आणि आदर्श समाज यांबद्दल, तर दुस-या भागात तत्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिस-या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा या विषयी लिहिलंय.
Release date
Audiobook: 11 February 2022
English
India