Step into an infinite world of stories
‘संदेसे आते है’ ---प्रत्येक भारतीय माणसाला माहित असेल हे ‘बॉर्डर’ चित्रपटातलं गाणं. एका परिचित चित्रपटातलं सुपरिचित गाणं. मात्र हा चित्रपट ज्या युद्धावर आधारलेला आहे ते लोंगेवालाचं युद्ध मात्र बर्याच लोकांना फारसं माहित नसतं. भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यान झालेलं हे युद्ध पश्चिम आघाडीवर लढलं गेलं. ह्या अतिशय महत्त्वाच्या लढाईला ४ डिसेंबर १९७१ पासून तोंड फुटलं; ६ डिसेंबरपर्यंत हा संघर्ष चालू होता. राजस्थान सीमेवरचं ‘लोंगेवाला’चं युद्ध कोण जिंकतो ह्यावर पश्चिम आघाडीवरच्या युद्धाचं भवितव्य होतं. भारतीय पायदळाच्या ज्या १२व्या डिव्हिजनकडे ह्या भागाच्या संरक्षणाची व्यवस्था सोपवलेली होती ती राजस्थानच्या ईशान्य भागात तैनात केलेली होती. जर लोंगेवाल जिंकून घेण्यात पाकिस्तानला यश मिळालं असतं तर भारताच्या संरक्षणाचा व्यूहच बदलून गेला असता! मग १९७१ च्या युद्धाची गाथा वेगळीच झाली असती. लोंगेवालाच्या लढाईची हि ऐतिहासिक कहाणी....या ऑडिओ बुक मधील साऊंड इफेक्ट्स ऎकताना हेडफोन जरूर वापरा.. © Nitin Gadkari; Zankar Audio Cassettes
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793709
Release date
Audiobook: 15 August 2021
English
India