Step into an infinite world of stories
या भागात आपण ऐकणार आहोत १९७१ च्या युद्धातील एक निर्णायक लढाई . ही लढाई हेलिकॉप्टर वापरून सैनिक आणि दारूगोळा व यंत्र सामग्री घेऊन नदी ओलांडण्याची ठरली. वरिष्ठ अधिकारी सोडले तर सारेच अधिकारी पोरगेलेसे – नुकतेच विशी पंचविशीत असलेले सळसळत्या रक्ताचे – होते आणि लढाईचा अनुभव घ्यायला उत्सुक असल्यामुळे केव्हाही सांगा आम्ही युद्धाला तयार आहोत असा त्यांचा जोश होता. दूरदृष्टीने योग्य निर्णय घेणारे वरिष्ठ सेनाधिकारी आणि त्यांचे हुकूम पाळणारे नौजवान होते. भूदल आणि विमान दलाचे या लढाईतले सेनाधिपति हे जन्मजात राजपूत सैनिक होते. गर्भगळित झालेला शत्रू चुकीचे आराखडे बांधल्यामुळे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार होता. कसा ? तेच तर ऐकायचं आहे आपल्याला ..
© 2021 Zankar (Audiobook): 9789393051226
Release date
Audiobook: 6 December 2021
English
India