Step into an infinite world of stories
4.8
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 24 डिसेंबर 2015
गजा हा शरीरविक्री करणाऱ्या माऊलीचा मुलगा शाळा शिकू शकला नाही. शीघ्र बुद्धीचा गोरक्ष पाटील याला श्रीमंत आई-वडिलांनीच शिक्षणापासून पारखे केले. प्राप्त परिस्थितीनेच चांडोलीच्या मुलांची ससेहोलपट केली. शबानासारख्या सुंदर मुलीवर झालेला अत्याचार गुपचूप सहन करावा लागला. सुजीतसारख्या गोड मुलाने पालकांच्या हट्टासाठी आपले जीवन संपवले. या सगळ्यांचे जीवघेणे दुःख माझ्या मनाला आजही छळते आहे. या लिखाणामधून त्याला वाट करून देता आली. मनाची ठसठस थोडीशी थांबविता आली. मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबाबतीत जे अनुभवले, ते लिहून काढले. त्यात उसनेपणा, दिखाऊपणा,खोटी ऐट मिसळली नाही. आरडाओरडाही नाही.. मुलांबद्दल जे वाटले, ते लिहून काढले. आता असंख्य विद्यार्थी माझ्या मनाच्या कोपऱ्यात थांबून लिहिण्यासाठी साद घालीत आहेत.
Release date
Audiobook: 21 July 2023
English
India