Step into an infinite world of stories
4.2
Biographies
अहमदनगरमधील चित्रागल्ली काही वर्षांपूर्वी वेश्याव्यवसायासाठी ओळखली जात असे. येथील महिलांच्या हालाखीच्या जीवनात बदल घडवून आणता येईल का, हा विचार करताना या महिलांच्या मुलांच्या केविलवाण्या भविष्याकडे गिरीश कुलकर्णी यांचे लक्ष वेधले गेले आणि त्यातून त्यांनी संध्याकाळची शाळा सुरु केली.येथूनचं सुरु झाली 'स्नेहालयाची' वाटचाल. १९८९ मध्ये संस्थेची अधिकृत मुहूर्तमेढ रोवली. रात्रघर, दिवसाचे सांभाळगृह, निवासी प्रकल्प असे मुलांसाठीचे काम विस्तारले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांचे हालाखीचे जीवन सुधारण्याच्या उद्दिष्टाकडे गिरीश कुलकर्णी यांनी वाटचाल सुरु केली. एड्स, गुप्तरोगाच्या शिकार झालेल्या महिलांना 'स्नेहालय'ने आधार दिला. हळूहळू गिरीश कुलकर्णी व प्राजक्ता कुलकर्णी यांच्या प्रेम, आपुलकीमुळे 'स्नेहालय' हे वेश्यांचे नाही तर अनेक अनाथांचे, पीडितांचे घर बनले. समाजापासून नाळ तुटलेल्या वंचितांना समाजाशी जोडणाऱ्या व समाजाला त्यांच्या वेदनेशी जोडणाऱ्या 'स्नेहालया'चे स्नेहबंध शुभांगी कोपरकर यांनी 'परिवर्तनाची पहाट'मधून उलगडले आहेत. © Sau. shubhangi koparkar
© 2021 Zankar (Audiobook): 9789383870554
Release date
Audiobook: 15 July 2021
English
India