Step into an infinite world of stories
"सावित्री’ ही पु. शि. रेगे यांची पत्रात्मक कादंबरी एखाद्या तरल कवितेसारखीच. सावित्री ही पत्ररूप कादंबरी. अवघी ४९ पत्रं असलेली. आकार छोटा, पण अवकाश मोठा अशी. आईविना वाढलेल्या, तरुण बुद्धिमान मुलीच्या विचारविश्वाचा, भावभावनांचा पस मांडणारी. सुरुवातीला मुग्ध आणि नंतर परिपक्व होत जाणाऱ्या तिच्या प्रेमाचा प्रवास सांगणारी ही कादंबरी. पण तरीही ती केवळ प्रेमकथा नाही. तिच्याच वडिलांच्या शब्दात सांगायचं तर ती आनंदभाविनी आहे. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, आपल्याला जे जे हवं ते आपणच व्हायचं ही तादात्म्यता तिच्यात आहे, पण असं एकरूप होतानाही आपलं मीपण हरवू न देण्याचं भानही तिच्याकडे आहे. आनंदी, खेळकर, विचारी, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेली, विचक्षण, धीट, उत्कट अशी ही तरुण मुलगी आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Audiobook): 9789391422790
Release date
Audiobook: 10 September 2021
English
India