"एका कोळियाने "हे पुस्तक इंग्लिश लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या "द ओल्ड मॅन अँड द सी "यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा मराठी अनुवाद आहे.. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते. मूळ पुस्तकातील चित्रांचा वापर पुस्तकात केला असल्याने वाचकाला समग्र अनुभव मिळतो.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353811426
Release date
Audiobook: 10 May 2020

Overall rating based on 852 ratings
Inspiring
Motivating
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 852
Rashmi
25 Aug 2020
अर्नेस्ट हेमिंग्वे ची ही नोबेल प्राइज विनर कलाकृती. मूळ इंग्रजी एकदा वाचली आहे.भाईंनी केलेला अनुवाद या पूर्वी तीन वेळा वाचला आहे.विक्रम गोखले यांच्या भारावून टाकणाऱ्या आवाजातील स्टोरीटेल ची ही पेशकश सर आंखो पर
Sangram
21 May 2020
पुस्तक चांगले आहे पण अभिवाचन तेवढे चांगले झाले नाही. आवाजातले बदल तेवढे चांगले नव्हते. Storytel ने sound चा ही वापर करून पहावा. म्हणजे समुद्राचा आवाज, पक्षांचा आवाज वगैरे
गणेश
11 Oct 2020
मुळात गोष्ट छान आहे. इंग्रजीमध्ये वाचताना तर बहार येते. एका म्हाताऱ्या कोळ्याची गोष्ट एका वयस्कर अभिनेत्याने वाचण्याचा Storytel चा अट्टाहास समजण्या पलीकडचा आहे. सुरवातीच्या २-३ मिनिटातच रसभंग होण्यास सुरुवात होते. चाकोरी सोडण्याचे धाडस Storytel ने करावे. नवनवीन voice over artist ना संधी द्यावी. १ स्टार फक्त अभिवाचना मुळे. Ernest Hemingway ची ही ' एका कोळीयाची ' गोष्ट मात्र कुठल्याही rating पलीकडची आहे.
Anuja
24 May 2021
पुलंच लेखन.. जणू काही त्या होडीवरून आम्हाला सफर घडवंत होतं.. त्या म्हतार्या कोळ्या बरोबर..विक्रम गोखले यांनी केलेलं कथन मनाचा ठाव घेणारं आहे..जिद्द टिकवूक पुढे पुढे जात रहायला शिकवणारं कथानक आवडले.
Ashish
4 Mar 2021
अतिशय साधी भाषा आणि सुरेख सादरिकरण.
दीपक
23 Nov 2020
खूपच छान ..सकारात्मक दृष्टींनी आयुष्याकडे पाहण्याची वृत्ती देणारे दिशादर्शक पुस्तक ..गोखल्यांच कथन म्हणजे प्रश्नच नाही .. उत्तमच ..प्रत्येकानं आवर्जून वाचावं किंवा ऐकावं असे
Mukesh
24 Jun 2021
कथा छान असेल कदाचित पण विक्रम गोखलेंच अभिवाचन कंटाळवाण वाटल्याने पुस्तक ऐकण मध्येच सोडलं..
Saurabh
3 Feb 2021
Sad story.. lengthy.. meaningless end. Waste of time
Sudhakar
6 Aug 2020
Not that interesting
Mangesh
6 Aug 2020
एकूणच कथा सुरेख रंगवली आहे . एक वेळ ऐकण्यासरखी आहे .
Step into an infinite world of stories
English
India