Step into an infinite world of stories
जोहान बोज नावाच्या मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्या पोलिस अधिकार्याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन प्राथमिक तपास करणारी व्यक्ती म्हणजे त्याचा बॉस ॲक्सेल बोर्ग याला ही निर्घृणपणे केलेली हत्या असल्याचा संशय येतो. जोहान बोजचा नऊ वर्षाच्या मुलगा ती कार आपण पाहिल्याचे आणि त्या कारच्या ड्रायव्हरने पोलिसाचा गणवेश घातला असल्याचे सांगतो. हा फक्त मुलाच्या विचित्र कल्पनाशक्तीचा खेळ असेल का? जेव्हा पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून त्याचा मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं तेव्हा स्वतंत्र पोलिस तक्रार आयोगाच्या रोलॅन्डो बेनितो या गुन्हे निरिक्षकाकडे ही केस सोपवली जाते. या धडकी भरवणार्या हत्येमागे जोहानच्या एखाद्या सहकार्याचा हात असू शकतो का?
इंगर गामलगार्ड मॅसन (जन्म १९६०) या एक डॅनिश लेखिका आहेत. मॅसन या मुळात ग्राफिक डिझायनर होत्या. २००८ मध्ये ‘डॉकबार्नेट’ ही त्यांची पहिली रहस्यमय कादंबरी प्रसिद्धी झाली आणि त्यानंतर त्यांनी या साहित्यप्रकारातील अनेक पुस्तके लिहिली. ‘ड्रॅब एफ्टर बिगारिंग’(२००९), ‘स्लॉगन्स गिफ’(२०१४), ‘डामा ऑग बॉडेल’(२०१५), ‘ब्लॉडरेगन’(२०१६), आणि ‘द क्लिनर’(२०१९) ही त्यापैकी काही.
© 2019 SAGA Egmont (Ebook): 9788726232158
Translators: Saga Egmont
Release date
Ebook: 26 November 2019
English
India