मंदारची - सुशिंचा लाडका मानसपुत्र. बुद्धिमान, दिलखुलास पण अत्यंत तल्लख विचार करणाऱ्या तरुणाची , जो नेहमी गुन्ह्यांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकतो आणि आपल्या हुशारीने निरपराध लोकांची सुटका करतो. कथेच्या सुरुवातीला च मंदार चित्रपटगृहात चित्रपट पाहत असताना त्याच्या शेजारीच बसलेल्या डॉ. गोयलचा खून होतो,गोळीबार करणारा अज्ञात मारेकरी तिथून पळ काढतो आणि चित्रपटगृहात एकच अफरातफर उडते. सुरुवातीला ही एक अत्यंत साधी हत्या वाटते, पण सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे घेईल तो मंदार कसला? कोण असेल या खुनामागे ? या खुनामागील हेतू काय ? की ही साधी हत्या नसून एक ठरवून आखलेली साखळी तर नाही ना ? का कुणाचा बदला घेण्याचा खेळ तर दडलेला नाहीना यात ? या असंख्य प्रश्नांची उत्तरे घेऊन येत आहे सुहास शिरवळकर "लिखित रहस्यमय कादंबरी "अफलातून" सागर कदम यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648912
Release date
Audiobook: 11 December 2025