Step into an infinite world of stories
4.1
4 of 20
Biographies
रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्र - महाजन
महाजन मनिलेंडरच्या कंजुषपणाच्या अनेक कथा गावात सांगितल्या जात असत. आपल्या मुलाच्या बालवाडी पासून महाविद्यालयापर्यंतचे सर्व शिक्षणाचा खर्च पोस्टकार्डाच्या एकाच बाजूला लिहिलेला होता. एकदा अण्णा महाजनांनी दूध पिऊन भांडं इतकं स्वच्छ केलेलं की त्याच भांड्यात बायकोने दूध घेतले. अण्णांनी कधीही आंघोळीला साबण लावला नाही किंवा कपड्यांना पाचशे एकचा बार लावला नाही. कधीही जोड्यांना दुरूस्त केला नाही किंवा कपड्यांना शिवलं नाही. महाजनांच्या या कंजुंषीला काय म्हणावे. त्यांच्या तिजोरीत ढिगभर दागिने व व्याजाचे पैसे लोळत असताना या माणसाने एकाही पैशाचा उपभोग घेतला नाही. असं म्हणतात, बाळाचा जन्म होतो तेव्हा एका काळाचाही जन्म होतो आपल्याला मिळालेल्या या साठ सत्तर वर्षांच्या काळाचा हिशोब मांडणा-या महाजनाची अखेर मात्र सर्व इच्छा अतृप्त ठेऊनच झाली.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354343810
Release date
Audiobook: 11 April 2021
English
India