Step into an infinite world of stories
सिद्धार्थ गौतम स्वतःचा राजवाडा सोडून त्याच्या अध्यात्मिक प्रवासासाठी निघून गेला. त्याने अंतिम सत्याचा शोध घेत ज्ञान प्राप्ती करून घेतली आणि तो बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाला . गौतम बुद्धाच्या आयुष्यातली हि कहाणी शतकानुशतके लोकांपर्यंत पोहोचली. तरीही एका गोष्टीवर कोणालाही प्रश्न पडला नाही कि बाळंतपणानंतर त्याची पत्नी पूर्ण बरी होण्याआधीच तिचा पती जो असुरक्षित कोशात जगणारा राजकुमार होता - तो आपले कुटुंब , धनदौलत , साम्राज्य मागे सोडून निघून गेला. तेव्हा यशोधरा इतकी शांत का झोपली होती ? यशोधरा या कादंबरीत ,इतिहासात अवगत नसलेल्या रिक्त जागा, नेमक्या स्पष्ट कल्पनांनी , चपखलपणे भरण्यात आलेल्या आहेत. ती तरुणी नेमकी कोण होती ? जगाकडे तिचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशामुळे आकारला गेला? अल्पावधीतच आपलं वैवाहिक जीवन अविश्वसनीय रित्या बदलणार आहे हे सिद्धार्थशी लग्न करताना सोळाव्या वर्षीच कळलं होतं का? वोल्गा यांच्या स्त्रीवादी कथानकातून भेटतो , ती स्त्री चतुर आणि कनवाळू आहे. शिवाय अध्यात्मिक ज्ञान स्त्रियादेखील मिळावे यासाठी नवीन पायवाट तयार करू पाहत आहे.
Release date
Audiobook: 18 December 2020
English
India