Kul Vyaktichitre : Damu Raghuvir Kulkarni
Step into an infinite world of stories
4.4
16 of 20
Biographies
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : प्रोफेसर सहस्रबुद्धे
दादरला शिवसेना भवन आणि आझाद रेस्टॉरन्टच्या मधल्या त्रिकोणी फूटपाथवर नेहमी बसणारा हा भिकारी. कुरळे केस, दाढीचे खुंट आणि हातात पिवळा हत्तीची सिग्रेट. त्याला सगळे प्रोफेसर म्हणत. असे अनेक वेडे दादरला दिसत. प्रत्येकाचे वेगळे नाव आणि वेगळी त-हा. प्रोफेसर मात्र तसे नव्हते. ट्रॅफिक आयलंडच्या त्रिकोणात बसणा-या या प्रोफेसरकडे पी.एच.डी. करणाारे आणि आयआयटीमधली पोरं प्रॉब्लेम्स घेऊन येत. एक सिगारेटचे पाकीट आणि चहा देऊन आपण आणलेले गणित सोडवून घ्यायचे. गणिताने वेड्या केलेल्या या माणसाला आयुष्याचे गणित काही सुटले नव्हते. त्यांची नेमकी काय कहाणी होती?
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354341465
Release date
Audiobook: 13 June 2021
English
India