Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

सिंगापूर डायरी

2 Ratings

4.5

Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

बऱ्याच दिवसांनी डायरी लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. त्याला कारण म.सा.प. चे पदाधिकारी श्री. दीपक करंदीकर. या पुस्तकास निमित्त झाले त्यांचे बोलणे. सिंगापूरला निघताना ते मला म्हणाले, ‘ जाताच आहात तर एक विनंती करतो. एक छानशी रोजनिशी लिहा. ज्यात त्या देशाविषयीचे तुमचे अनुभव लिहिलेले असतील. ’ मी सहज म्हणाले, ‘ लिहीन, नक्की लिहीन. ’ आणि अगदी पहिल्या दिवसापासून डायरी लिहायला घेतली. डायरी लिहिता लिहिता स्वतःचे मन उलगडत गेले. माझ्या जगण्याविषयीच्या भावना, संवेदनांना मुखरित करत गेले. माझा जीवनपट त्यातून उलगडणे अपरिहार्य होते. लिहिता लिहिता माझे मनही कुठेतरी ठिबकत गेलेच. त्यालाही मी फारसा अटकाव नाही केला. सिंगापूरसारख्या लाघवी देशात वावरताना आलेले काही प्रसंग, काही अनुभव, काही आवडलेली स्थळे टिपत गेले. मुख्य म्हणजे त्या देशाची मानसिकता जशी मला कळली, भावली, ती मांडण्याचाही प्रयत्न करत गेले. इतकासा टिचभर देश; पण जगाच्या नकाशात हा ठिपका चांदणीसारखा चमचम करतो आहे. फक्त उंचपुऱ्या चाळिशी, पंचेचाळिशीचे वय या देशाचे ! पण जगाच्या नकाशावर अव्वल स्थान मिळवू बघतो आहे. काय कारणे असतील यामागची ? तो देश आणि माझा देश यातही मग नकळतच तुलनात्मक विचार मनात येत गेले, त्यालाही निःसंकोचपणे मोकळी वाट करून दिली. कारण डायरीच तर लिहीत होते ना ! तिथे मनाला मोकळी वाट मिळायलायच हवी होती. माझ्या आयुष्यातले काही गतानुभव, मनावर कोरल्या गेलेल्या व्यक्ती, प्रसंग याचीही वाट मिळेल तिथे मांडणी झालीच ! माझ्या घरासारखीच इतरही घरे ! म्हणजे माझे अनुभव ते इतरांचेही असतील. ही डायरी वाचताना त्यांना कौटुंबिक पातळीवर पुन्हा अनुभव घेतल्याचा प्रत्यय येणेही शक्य आहे. असा प्रत्यय घेणेही कधी कधी आनंददायी असते. तर असा हा डायरी प्रपंच आज आपल्या स्वाधीन करीत आहे. ही डायरी लिहिताना आणखी एक धाडसी प्रयत्न केला, तो म्हणजे ही डायरी स्वतःच लॅपटॉपवर छापत गेले म्हटले आत्ताच्या काळात कॉम्प्यूटर न येणे म्हणजे आपण निरक्षर अशी गणना होईल, ते नको ! तेव्हा हा माझा पहिला प्रयत्न म्हणून काही चुका असल्याच तर गोड मानून घ्या इतकीच विनंती ! - डॉ. माधवी वैद्य

© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789388740555

Release date

Ebook: 6 May 2021

Others also enjoyed ...