Step into an infinite world of stories
Classics
मराठी साहित्यातील पहिले थोर विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या बत्तीस विनोदी लेखांचा ‘ सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य-बत्तिशी ’ हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक भूषण आहे. मराठीतील एक अभिजात पुस्तक (Classic) म्हणून त्याची गणना होते. म्हणूनच केंद्र सरकारच्या ‘ नॅशनल बुक ट्रस्ट ’ या मान्यवर साहित्य संस्थेने भारतातील चौदा भाषांत त्याचा अनुवाद करून घेतला आहे. मुळात हे पुस्तक १९०९ साली प्रसिद्ध झाले ते १८ लेखांचे होते. त्यामुळे त्याचे नावही ‘ सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे ’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर श्रीपाद कृष्णांनी लिहिलेल्या चौदा नव्या लेखांची भर घालून ‘ सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य-बत्तिशी ’ म्हणून मॉडर्न बुक डेपोवाल्यांनी ते प्रकाशित केले. हे ‘ सुदाम्याचे पोहे ’ इतके लोकप्रिय झाले की, त्याच्या आवृत्यांवर आवृत्या निघाल्या, पुढे १९५३ साली लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वारले तरी त्यांचे हे पुस्तक अजरामर होऊन राहिले.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9789390172993
Release date
Ebook: 6 May 2021
Tags
English
India