विनीत, बिल्वा आणि मिली हे एक त्रिकोणी सुशिक्षित, सुविद्य कुटुंब. समृध्द आणि आनंदी आयुष्य जगणारं. अमेरिकेत वास्तव्य करून असलेलं. स्वतःच्याच कोषांत गुरफटलेलं, आत्मरत.. त्यांच्या न कळत एक भयंकर तुफान त्यांच्या आयुष्यात येऊन धडकतं नि त्यांच्या परस्पर नात्यांचा, कुटुंबाचा पोत विस्कटून टाकतं. एकुलत्या एका मुलीनं असा कोणता गुन्हा केला होता की ज्यामुळे तिला नि तिच्याबरोबरच तिच्या जन्मदात्यांना एवढी जबर शिक्षा व्हावी? इतरांहून वेगळ्या लैंगिक प्रेरणा असणं हा अपराध असतो का? ऐका डॉ अनघा केसकर लिखित सर आली धावून....या लघु कादंबरीत !
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356043831
Release date
Audiobook: 1 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 219 ratings
Heartwarming
Sad
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 219
Sheetal
16 Jun 2022
कथा छान आहे...विषय ही वेगळा आहे...परतू..ज्या विषयने सुरुवात केली.तो विषयच योग्य प्रकारे मांडला गेला नाही..कथा कुठे कुठे भरकटलेली दिसते....ही गोष्ट मनाला अजिबात पटली नाही की एक आई आपल्या एकलत्या एक मुलीशी अशा पधतीने वागू शकते..जिथे आईच आपल्या मुलीला समजून घेऊ शकली नाही..तिथे समाजाकडुन काय अपेक्षा ठेवायच्या...उलटपक्षी नंतर आई चे मत परिवर्तन होऊन ती आपल्या मुलीच्या मागे खंबीरपणे उभी रहाते असा शेवट करने अपेक्षीत होते...तसेच त्या मुलीला कशा प्रश्नांना समोरे जावे लागते...ह्या वर कथा फुलवता आली असती...असो...
Siddharth
6 Jun 2022
डॉ अनघा केसकर यांच्या लेखणीतून साकारलेली एक छान कादंबरी...आणि मानसी वझे याचं उत्तम अभिवाचन...यामुळं ऐकायला उत्तम वाटली...मिली-विनीत-बिल्वा यांच्या भोवताली फिरणारी कथा,रंजक आहे पण त्याहून विचार करायला लावणारी आहे,आपल्याकडे विशेष चर्चा न होणाऱ्या विषयावरील हि कादंबरी विविध भावना,विचार पद्धती योग्य प्रकारे मांडते आणि आपल्याला विचार करायला भाग पाडते छान👌✔️
Aparna
3 Jun 2022
The book and the reader both good
नितिन
20 Aug 2022
ऐकायला सुरुवात केल्यावर खिळवून ठेवणारी कादंबरी !समलिंगी आकर्षणामुळे ती व्यक्ती आणि तिचं कुटुंब यांची होणारी मानसिक ओढाताण अतिशय सुंदर रंगवली आहे .मात्र काही गोष्टी पटत नाहीत . विनीत ची परिस्थिती कळल्यावर त्याची आई त्याला सरळ सरळ बायकोला टाकून देऊन दुसरे लग्न करण्यासाठी मुलगी देखील सुचवते . लैंगिक संबंध बद्दल अतिशय कंजर्वेटिव्ह असणारी बिलवा काही तासापूर्वी ओळख झालेल्या व्यक्तीला आपलं शरीर द्यायला तयार होते आणि त्यात तिला काही गैर करतो आहोत असं वाटत नाही . .
Prachi Kulkarni
10 Sept 2022
Nice story
Puja
16 Jul 2022
Nice story and Nicely narrating. Its new generation's teenager problem is discussed well,
Rajeshwari
19 Jun 2022
मानवी मनाचे कंगोरे खूप चांगल्या प्रकारे रेखाटले आहेत विशेषतः अश्लील प्रसंग न दाखवता! लेखिकेने ज्या तऱ्हेने बारकाव्यांचं वर्णन केलं आहे त्यावरून असं वाटतं की तिने ही केस आयुष्यात खूप जवळून अनुभवली आहे. प्रत्येक प्रकरणाची सुरुवात, ' कादंबरी... प्रकरण १ इ.' या वाक्याचं अत्यंत कृत्रिम वाचन वगळता बाकी कादंबरी छान वाचली आहे.
Suresh Kokitkar
4 Jun 2022
आयुष्यात येणाऱ्या अनपेक्षित घटना सुंदर संसाराला कसा सुरुंग लावू शकतात याची सुंदर मांडणी केलेली कादंबरी अवश्य ऐका.
Shradha
18 Jun 2022
Interesting
Sachin
20 Aug 2022
छान
English
India