Step into an infinite world of stories
चिन्मय मांडलेकर ह्या नावाची ओळख महाराष्ट्राला करून देण्याची तशी आवश्यकता नाही. राष्ट्रीय नाट्यशाळेचा स्नातक, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार, ह्या शिवाय अत्यंत लोकप्रिय मालिकांचे कथा पटकथा लेखक म्हणून सुद्धा ते खूप प्रसिद्ध आहेत. आणि तरीसुद्धा ती ओळख काही अंशी अपुरी अशी आहे असे मला तरी वाटते. ह्याचे कारण त्यांचे स्फुटलेखन!
स्फुट लेखनाची काही वैशिष्ट्य असतात. एक तर ती आजच्या किंवा कालच्या घटनेवर भाष्य करीत असतात. म्हणजेच त्यांचे ताजेपण महत्वाचे असते. ते लेखन घडलेल्या घटनेवर भाष्य तर करतेच पण त्या घटनेच्या अंतरंगात डोकावून एक वेगळा विचार वाचाकां समोर मांडण्याचा जरूर प्रयत्न करते. त्या लेखनात टीका असते पण त्या टीकेत विखार नसतो. एक विधायक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न अशा स्फुट लेखनात असते. वैचारिक मंथनाचे असे स्फुट लेखन हे अधिष्ठानच असते.
विषयांचे वैविध्य, आणि वाचकाशी सरळ संवाद साधण्याची त्यांची शैली तुम्हाला खूपच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.
© 2021 Srujan Dreams Pvt. Ltd (Bookhungama.com) (Ebook): 9788194186915
Release date
Ebook: 6 May 2021
English
India