Pratiti Saniya
Step into an infinite world of stories
सुरुची थबकली. श्रीरंगबरोबर अनेक दिवस, अनेक वेळा घालवल्या. त्याचे विचार तर ऐकून ऐकून माहिती व्हायलाच लागलेले होते. तो किती निराळा मनुष्य आहे. चारचौघासारखा - कुटुंबाबद्दल प्रेमाने बोलणारा, करियरची स्वप्नं असलेला. बायको-मुलं-संसार, मग घर-फ्रिज-टीव्ही घेण्याचे बेत करणारा - असा अजिबात नाही. किंबहुना, या सार्या गोष्टींबद्दल त्याला किती तिडीक आहे, तो कशी त्यांची नेहमी क्रूर चेष्टाच करत असतो तेही कळत गेलं आणि तरीही आपण श्रीरंगच्या प्रेमात पडलो म्हणजे काय? 'तरीही'चा अर्थ काय? आपल्याला कुणी लग्न-संसार-मुलं देऊ शकणारा नवरा हवा होता काय?
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353379209
Release date
Audiobook: 6 March 2019
English
India