4.8
Non-Fiction
रोजच्या रहाटगाडग्यात पिसलेला तो एका बेसावध क्षणी जागो होतो. उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न पाहतो. स्वप्नाला स्वप्न जोडत धाडसी स्वप्नाळूंची एक टोळी जमते आणि सुरु होतो स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा थरारक, रोमहर्षक प्रवास… ड्रीमर्स अॅन्ड डूअर्स वाचताना आपण लेखकासोबत गाडीवर मागे बसून या प्रवासाचे भागीदार होतो. येतील ती आव्हानं वरदान म्हणून झेलतो, पेलतो, समृद्ध होतो. सात देशांचा इतिहास, भुगोल, वर्तमान, निसर्ग, अर्थकारण, समाजकारण, अवस्था, व्यवस्था, राहणीमान, खानपान… याची देही याची डोळा अनुभवतो. आजूबाजूच्या जगण्याकडं डोळसपणे पाहत त्या त्या भागातील माणसांच माणूसपण काळजात साठवतो. फिरण्याचा, जगण्याचा अन् जगाकडं पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन, नवी उर्मी, नवा आत्मविश्वास देणारं… स्वप्नपूर्तीची दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करणारं आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मोहीमांचे स्वप्न पाहणारांना उत्तम मार्गदर्शन करणारं आवर्जून ऐकावं असं पुस्तक ! . . . © Dr. Satilal Patil
© 2022 Zankar (Audiobook): 9788194706007
Release date
Audiobook: 11 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 311 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 311
Nishigandha
25 Jan 2022
खूपच सुंदर साहसी आणि थरारक अस वर्णन आहे नक्किच वाचावी अशी सुंदर आणि अमेझिंग अशी साहसी कथा आहे मोटिवेटिंग इंस्पायरिंग !!!काहीही होऊ देत हार मानायची नाही !!हातात घेतलेलं काम पूर्णच करायचं !!कितीही अवघड परिस्थिती येऊ दे त्याला आनंदाने समोर जायचं असा खूप काही शिकायला मिळालं !!!Thank u so much !!!☺️👍👌💐
Ankush
4 Feb 2022
शब्द पुरणार नाहीत वर्णन करायला..निव्वळ अप्रतिम..!!पुस्तक,त्यातील वर्णन, मध्येच डोकावणारा इतिहास, थरारक अनुभव, अलंकारिक भाषा.. सारंच जबरदस्त!!!!..आणि, याहून थरारक म्हणजे अखेरीस ओढवलेला प्रसंग.त्यातून लेखकाने ज्या प्रकारे स्वतःला सावरलेय..;नव्याने उभे केलंय..खूपच प्रेरणादायी..!..आणि हो,ओम भूतकरांनी आपल्या स्वरांनी अजूनच रंग भरलाय..!!
Manjusha
24 Jan 2022
अतिशय सुंदर, प्रेरणादायी प्रवास अनुभव लेखन.2 -3 दिवस ऐकण्यात कसे गेले कळले नाही,आपणही त्यांच्या सोबत प्रवासाचा अनुभव घेतो असे वाटते. वाचन छान.
Omkar
31 Jan 2022
One of the best audiobook I have heard…must experience the book …
Makarand
14 Feb 2022
हे काही नुसते प्रवास वर्णन नाही. हे पुस्तक प्रेरणा निर्माण करते, खिळवून ठेवते. यातली भाषा जितकी सुबक आहे तितकीच ती मनोरंजक देखील आहे. चाकोरीतून बाहेर पडायची एक ओढ निर्माण करते. "जीवन एकदाच मिळाले आहे, ते भरभरून कसे जगायचे" हे सांगते. एकदा ऐकायला सुरुवात केली कि मग थांबायलाच नको!
Mitesh
15 Feb 2022
Very nicely written by Dr. Satilal Patil by beautifully narrated by Mr. Om bhutkar.. I felt and lived evey moment of this 57 days Journey.. This book is motivation to all of us that pain is temporary.. Hats off to Dr. Patil about his positiveness towards life.. I wish I will meet him some day..
Amit
28 Feb 2022
Atishay Prerna dai sahas katha ..bike riding sobat jivana cha arth ulgadyacha chan prayatna kela ahe
Suprit
1 Feb 2022
खूप सुंदर आणि प्रेरणादायी पुस्तकं. तुमच्याबरोबर मी ही pune- सिंगापूर-pune हा प्रवास करून आलो. तुमची शाब्दिक कोटी अतिशय जबरदस्त आहे. गेजबाबदार वाल्या कोटीला मी पोटधरून हसलो. नकारात्मक तोची हत्या हा या पुस्तकातील सर्वात मोठा धडा घेऊन मी ही सकारत्मक तो ला बलवान करणारं आहे.
Anshul
23 Jan 2022
सकारात्मक तो चा नकारात्मक तो वर विजय!!!
Vicky
18 Jan 2022
कमाल कमाल कमाल प्रत्येकाने एकदातरी ऐकावे असे प्रवासानुभव
English
India