Bhaykatha Hrishikesh Gupte
Step into an infinite world of stories
डिव्होर्सी आई-वडील , अब्यूज करणारा बॉयफ्रेंड यांना कंटाळलेली अंजनी सबनीस, त्यांच्यापासून दूर गोव्याच्या शांत सुंदर अश्या सोर्लेम गावात वर्क फ्रॉम होम करत सेटल होण्यासाठी येते. पण ती आल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून गावातली लहान मुलं एकामागोमाग एक गायब होऊ लागतात. तिला संशयित म्हणून पकडलं जातं . मानसिक रुग्ण असलेली माधवी , तो आलाय .. हसासोर आलाय म्हणत तिच्यासमोर किंचाळते. मुलांना गायब कोण करतंय ह्याचा माग काढताना अंजनीला इंस्पेक्टर अमर पाटीलच्या जुन्या टेप्स सापडतात. भीतीचा पंथ खरंच अस्तित्वात आहे का ? आणि त्याचा अंजनीच्या जन्माशी कसा संबन्ध आहे ह्याच्या मुळापर्यंत अंजनी जाऊ शकेल ? अमर पाटीलला शोधत आला तसा हसासोर अंजनीपर्यंतही पोहोचेल ?
Release date
Audiobook: 25 March 2024
English
India