Naivedya Darshan Desale
Step into an infinite world of stories
एवढी सुंदर बाई चेटकीण? कसं शक्य आहे? उमेशला हे महादेवीचं गूढ नेमकं काय हे समजून घ्यायचंच होतं. महादेवी'! हे नावही कुणी घेतलं तरी गावातले लोक अचानक अंगावर साप पडल्यासारखे दचकायचे! तिच्याबद्दलच्या त्या सगळ्या गूढ गोष्टी उमेशला आधी खोट्या वाटायच्या. पण महादेवीच्या घराबाहेर वेड लागून भेकणारा तम्मा गुरव आणि त्याला घेऊन यायलाही नदीपलीकडं न जाणारे, भेदरलेले गावकरी त्यानं डोळ्यांनी बघितले होते! त्यात महादेवीचं घरही तिच्याभोवतीचं गूढ अजून गडद करणारंच! जुनाट दगडी बांधकाम, भिंतींवर चढलेली दाट बाग आणि चमकणारे डोळे असलेले ते घराबाहेरचे भेसूर देव. ते घर एखाद्या दाढीवाल्या राक्षसाच्या चेहऱ्यासारखंच दिसायचं! आणि हिचं आरसपानी सौंदर्य!!
Release date
Audiobook: 4 September 2020
English
India