Step into an infinite world of stories
4.3
Non-Fiction
आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल. पण त्यांना या गोष्टी सांगणार कोण ? लहान मुलांना गोष्टी सांगणे हे खरेच कौशल्याचे काम ! आणि म्हणून तुमचं काम सोपं केलंय अपर्णा ताई आणि वंदना ताई यांनी. खास लहान मुलांसाठी निवडलेल्या काही विविध भाषांमधील बोधक रंजक लोककथा व परिकथा अपर्णा महाजन आणि वंदना भागवत यांच्या आवाजात या ऑडिओबुक मध्ये रेकॉर्ड केल्या आहेत. तेव्हा नक्की ऎका बोधक आणि रंजक कथा भाग १ मुखपृष्ठ - सुप्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन प्रकल्पासाठी विशेष सहाय्य शोभा पवार
© 2024 Zankar (Audiobook): 9788197307881
Release date
Audiobook: 14 June 2024
English
India