सुनिता देशपांडे यांनी आंतरिक ऊर्मीने लिहिलेल्या ललित लेखांतले पंधरा निवडक लेख ’सोयरे सकळ’मध्ये समाविष्ट आहेत. संगीत, साहित्य, कला आदी क्षेत्रांतल्या प्रतिभावान, नामवंत व्यक्तींचा लोभ, स्नेह, सहवास, पु. ल. देशपांडे यांच्यामुळे आणि स्वत:च्या संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे सुनीताबाईंनी लाभला. समृद्ध जीवनानुभवात त्या वावरत आल्या. त्यांतल्या काहींची व्यक्तिचित्रे या संग्रहात अंतर्भूत आहेत. भारतीय संगीतातले तीन दिग्गज मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, मातबर कथाकार जी. ए. कुलकर्णी, समीक्षक माधव आचवल, भाषाशास्त्रज्ञ डॉ. ना. गो, कालेलकर आदींची अविस्मरणीय चित्रणे इथे आढळतील. व्यक्तिचित्रणांत सुनीताबाईंना विशेष स्वारस्य दिसत असले तरी जीवनातल्या विविध अनुभवांचे मनोज्ञ दर्शन त्यांच्या अन्य लेखांतून घडते. लौकिक अनुभवातून चराचरातल्या चैतन्याच्या, अंतर्मुख करणा-या, सर्वस्पर्शी अनुभवाकडे त्या ’सोयरे सकळ’, ’चक्र’, ’साखळी’ अशा लेखांतून येताना दिसतात. ’एखादया गोष्टीतल्या रूपगुणांपेक्षा तिच्या गाभ्याला, अर्काला, मर्माला’ महत्त्व देणा-या सुनीताबाई आपल्या शब्दकळेने वाचकाला खिळवून ठेवतात. निर्भयता, परखडपणा या त्यांच्या विशेषांसमवेत, त्यांच्या मनाची कोवळीक त्यांच्या लेखनातून स्पर्श करत राहते. हे लेखन वाचत असताना, मन भरून येऊन, क्षणभर थांबून पुढे जावे असा अनुभव येतो. अनुभव तीव्रपणे घेण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शब्दांतून उत्कटपणे रूपातन्तरित होत भेटते. गुणसंपन्न, मोलाच्या अशा या लेखनाचा दुर्मिळ आनंद ’सोयरे सकळ’ वाचत असताना वाचकांना खचितच लाभले.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353811471
Release date
Audiobook: 8 November 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 105 ratings
Heartwarming
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 105
Priti
16 Aug 2022
👍🏻👌🏻
गंधार
22 Jan 2023
शेवटचे प्रकरण उगाच लिहील्यासारखे वाटले. अरुणाताईंनी हे पुस्तक स्वतःच्या लयीत वाचले. पण सुनीताबाईंची लय समजण्याचा प्रयत्न झाला असता तर पुस्तक अधिक खुलले आसते.
Sandip
4 Mar 2023
अप्रतिम! सुरवातीला वाचन थोडं संथ वाटलं. दोन वाक्यात पॉज जास्त. नंतर मग वाचन छान झालंय. पुस्तक तर उत्तमच.
Neha
18 Feb 2021
खुप छान
KEERTIKUMAR
23 Oct 2021
अरुणा ताईंचा आवाज म्हणजे प्रत्यक्ष सुनीताबाई आपल्याशी संवाद करतात असे वाटत राहतं. पुस्तक मनाला भिडतं.
Ashwini
22 Nov 2020
सुंदर, संपूच नये असे वाटले 👌👌👌👌
Deep
13 Dec 2020
Very good book.
Milinda
6 Jun 2022
Well, could not go through after the first 3 hours. Abhiwachan Dekhil khoop natki zala aahe.
उज्ज्वल
23 Aug 2023
अप्रतिम पुस्तक आणि अती सुंदर वाचन
SURENDRAKUMAR
20 Dec 2020
Very nice
English
India