Step into an infinite world of stories
१९८१ मधील ती खळबळ उडवून देणारी घटना .... अमेरिकेचे तात्कालिक अध्यक्ष रेगन यांच्यावर गोळीबार ! "त्यांनी बंदूकधारी व्यक्तीचे नाव सांगेपर्यंत मी माझा श्वास रोखून धरला. मला भीती वाटत होती की, तो माझा मुलगा आहे." १९८१ मध्ये जॅक आणि जो अॅन हिंकले यांचा मुलगा जॉन जॉनने अध्यक्ष रेगन आणि इतर तीन पुरुषांना गोळ्या घातल्यानंतर जे काही घडलं त्यानंतर अनेक चिंताग्रस्त पालकांकडून अशी पत्रे जॅक आणि जो अॅन हिंकले यांच्यापर्यंत पोहोचत होती. या विरुद्ध जेव्हा प्रत्यक्ष घटना घडली तेव्हा ,गंमत म्हणजे, हिंकलींना अशी भीती देखील वाटली नव्हती कि ती बंदूकधारी व्यक्ती म्हणजे आपला मुलगा असेल. जॉनच्या बालपणात त्यांनीअशी काही धोक्याची चिन्हे कधीच ओळखली नव्हती. "गंभीर मानसिक आजार असलेला त्यांचा मुलगा अचानकपणे त्रस्त होऊन अशी काही कृती करेल याचा नेम त्यांना नव्हता ... आणि ती घटना घडलीच... ब्रेकींग पॉईंट या हिंकली यांच्या पुस्तकावरील आधारित हे मराठी ऑडिओ बुक आहे . १९८१ मधील ती घटना आणि त्यानंतरचा तो क्लेशदायक घटना क्रम आपल्या समोर येतो तो 'हा माझा मार्ग एकला' या ऑडिओ बुक मधून. ... " हिंकलेच्या शोकांतिकेतून मानसिक आजारांच्या वास्तविकतेबद्दल चांगली जनजागृती झाली, तर त्यांनी जे भोगले त्याचे दुःख व्यर्थ ठरणार नाही ." -- प्रत्यकाने ऐकावे असे अप्रतिम मराठी ऑडिओ बुक .... प्रस्तुती झंकार स्टुडिओ आणि पुस्तक सादरीकरण - तनुजा राहणे
© 2023 Zankar (Audiobook): 9789395399463
Translators: Dr. Vijaya Bapat
Release date
Audiobook: 15 May 2023
English
India