291 Ratings
4.6
Language
Marathi
Category
History
Length
12T 43min

Aavran

Author: S.L. Bhyrappa Narrator: Sachin Khedekar Audiobook

डॉ. एस.एल. भैरप्पा यांना कन्नडमधील सर्वांत महान कादंबरीकार मानले जाते. पन्नास वर्षांच्या साहित्यिक कारकीर्दीत त्यांनी बावीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत, ज्या उर्दूसह बहुतांश प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत."आवरण" हि दोन धर्मातील प्रेमाची संघर्षमय कहाणी सांगणारी कादंबरी आहे.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणा-या मायेला "आवरण' म्हणतात. मला कळायला लागल्यापासून "सत्य-असत्याचा प्रश्न' हा छळणारा प्रश्न आहे. तीच समस्या "आवरण'मध्ये समूह आणि संपूर्ण राष्ट्राच्या पातळीवर उफाळून आली आहे. मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू, तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्वीकारावी लागेल. इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही! डॉ. एस. एल. भैरप्पा यांची गाजलेली कादंबरी

© 2020 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353815523 Original title: आवरण Translator: Uma Kulkarni

Explore more of