11 Ratings
3
Language
Marathi
Category
Lyric Poetry & Drama
Length
35min

Manatle Mazya

Author: Vijay Raut Narrator: Datta Sardeshmukh Audiobook

श्री साईनाथ...
मनातले माझ्या..
नमस्कार, मित्रांनो.. खरंतर लिहिणे हा माझा प्रांतच नव्हता किंवा कधी असा विचार ही आला नव्हता कि आपण असं लिहायला लागू किंवा लिहायला जमेल. कविता.. शेरोशायरी ऐकायला प्रचंड आवडायची.. पण लिखाण.. शक्य वाटतं नव्हते. पण दहा वर्षांपुर्वी अचानक रात्री 2..3 वाजता हा प्रवास सुरू झाला.. का? कसा? माहीत नाही... पण अचानक धो.. धो.. पाऊस पडावा आणि त्यात आपण नखशिखांत भिजून जावं असचं काहीसं झालं आणि शब्दांचा प्रचंड ओघ सुरू झाला.त्याचा आवेग प्रचंड होता... आणि मला तो थांबवणं शक्य नव्हते.. थरथरत्या हातांनीच मी वर्तमान पत्रातील जाहीरातीच्या कागदावर ते उतरायला सुरूवात केली. मला काहीच कळतं नव्हते मला फक्त डोळ्यासमोर शब्द दिसत होते... मी ते फक्त वेचून जोडत होतो. काही क्षणात ते लिहून झाल्यावर तो आवेग ओरसला... आणि जेंव्हा मी तो कागज वाचला तेंव्हा मी काय लिहिलंय याची जाणीव मला झाली. हे काहीतरी वेगळं आहे... तीच सुरुवात होती माझी लिखाणाची... त्यानंतर सुचणारी प्रत्येक कविता... चारोळी.. नवजात बालका सारखीच जन्म घेत गेली.. मी थांबवू शकत नव्हतो... तो सिलसिला अखंड चालू झाला तो अजूनही चालूच आहे. नंतर त्याचे नामकरण मी केले "मनातले माझ्या "त्यात वेगवेगळे विषय येत गेले... मनात येत गेलं मी लिहित गेलो.. कधी निसर्ग.. कधी नातेसंबंध... कधी प्रेम... सामाजिक.. मित्र मंडळी नातेवाईक यांनी प्रोत्साहीत केले आणि माझ्या गुरूंच्या आशीर्वाद ..यांच्या मुळे माझे पहिले "मनातले माझ्या"हे ऑडियो बुक तयार झाले...
जरूर एका आणि मनातील भावनांना मोकळं करा.. © Vijay Raut

© 2021 Zankar (Audiobook) ISBN: 9789390793686