313 Ratings
4.58
Language
Marathi
Category
Fiction
Length
12T 1min

Zool

Author: Bhalchandra Nemade Narrator: Shambhu Patil Audiobook

ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो.

एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरली आहे.ऐका - शंभू पाटील यांच्या आवाजात - झूल !

© 2021 Storyside IN (Audiobook) ISBN: 9789353813864 Original title: झूल

Explore more of