बाहेरच्या जगाचा दैनंदिन काळ आणि चांगदेवच्या व्यक्तिनिष्ठ काळामधील ताण याचं सुरेख वर्णन या कादंबरीत आढळतं. आधुनिक काळातील व्यक्तीची स्वविषयक जाणीव आणि भोवतालच्या सामाजिक वास्तवासंबंधीची जबाबदारीची जाणीव त्यांच्यातील संघर्षापासून सामानतेपर्यंतचे विविध प्रकारचे संबंध आणि ताणतणाव नेमाड्यांनी अत्यंत समर्थपणे ‘हूल’च्या रुपबंधातून अभिव्यक्त केले आहेत. नेमाड्यांनी केलेल्या चर्चा- कादंबऱ्यांतील सामूहिक अवकाशांशी, वास्तव जीवनातील समस्यांशी घट्टपणे निगडीत आहेत. हा सामूहिक अवकाश आणि चांगदेवला उपलब्ध झालेला खासगी अवकाश यांच्यातील द्वंद्व या कादंबऱ्यांमधून अत्यंत वेधकपणे मूर्त झाले आहे. ऐका भालचंद्र नेमाडेलिखित 'हूल' शंभू पाटील यांच्या आवाजात!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353813840
Release date
Audiobook: 14 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 465 ratings
Mind-blowing
Heartwarming
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 465
नंदू
29 Dec 2021
मुद्दा केवळ शिक्षण व्यवस्था हा नाहीतर एकूणच व्यवस्थेवर प्रश्न उभ करणारी कांदबरी . केवळ शंभू पाटीलच हे वाचू शकतो
Priya
2 Nov 2021
फार सुंदर कादंबरी आहे...व्यक्ती यातील चांगदेव चे पात्र..नक्कीच स्वतः अनुभवतो...शंभू पाटील यांचे ...निवेदन..शब्दांकन.. सादरीकरण उत्कृष्ट आहे..नक्कीच ऐकावी अशी कादंबरी..
Amruta
31 Dec 2021
उत्तम. शंभु पाटील यांनी खूप चांगले वाचन केले आहे. आवाजांचे चढ उतार खूप छान. लेखन छान.
Sandeep
29 Dec 2021
हूल कुणी कुणाला दिलीप्रेम आपल्याला हूल यदेतं की आपण प्रेमाला हूल देतोमुळात प्रेम म्हणजे काय स्त्री-पुरुषाचे प्रेम हेच खरं प्रेम असतं की आणखी काही वेगळा आहे की आपण आपल्या वर प्रेम करत असतो आपण जगतो म्हणजे जगण्यावर प्रेम करतो की जिवंत आहोत म्हणून जगतो अशा असंख्य प्रश्नांचा भवरा आपल्या भोवती उभा करत नेमाडे वाचकांना चूल देतात आणि शंभू पाटील आपल्याला बोल पाडतात
jagdisha
1 Dec 2021
बस इसी लव स्टोरी के खोज में था लवस्टोरी ऐसी कभी सुनी नहीं शंभू सर hats off u आपके लिए चंद अल्फ़ाज़ *पलकों से वो, आसुं झलकाते गए, जमाने वाले, उसके अदाकारी की, एक झलक है समझे!!!**फलक से टूटेने वाले, तारों की तरह, वो कई बार टूटे, जमाने वाले, खुद की मन्नत, पूरी होगी समझे!!!**आग बुझाते बुझाते वो, राख हो गए, जमाने वाले, बुझी आग को भी, फूँक कर क्या खाक समझे!!!**चाहत से वो, अपनी कोसों मील दूर ही रहें, जमाने वाले, करीब रह कर भी, फासलें न समझे!!!**खुद से, वो जुदा ही रहें, जमाने वालें उनमें, खुदा सा कोई रहता हैं, यह राज देर से समझे!!!**जगदीशा*
Sandip
23 Sept 2021
बेस्ट.👌🏻 आसं म्हनलं तरी काही वावगं व्हनार न्हाई...😀😀😀
Ashwini
26 Sept 2021
कादंबरी छान, वास्तवाचे सुंदर परीक्षण. अभिवाचन सुद्धा छानच, specially हसण्याचा आवाज आणि गाणे एक नंबर 😃👌
आशुतोष
14 Sept 2021
आता सुरवात केली ऐकायला . लगेच पकड घेणारा आवाज मनात शिरतो . मजा येणार ऐकायला हे नक्कीसंपूर्ण ऐकून मन भरून आलं . चांगदेवच अष्मीभूत झालेलं जग आपल्याला घेरून टाकत . एक बेचैनी मनात भरून राहते , ही बेचैनीच आपल्याला त्याचा पुढचा प्रवास ऐकायला भाग पाडते . नेमाडेंचा चांगदेव शंभु पाटलांना पुरेपुर कळला आहे .
vishal
31 Dec 2021
एक सुंदर प्रेमकहाणी म्हणून पण ही स्वतंत्र कांदबरी आहे . चांगदेव चतुष्टय मध्ये इथेच चांगदेव थोडा अडकला आहे . त्याच तटस्थपण बाजूला पडत हे वाचताना जाणवलं नाही ,पण ऐकताना मात्र स्वच्छ कळल ही जादू आहे शंभू पाटलांची .खूपच सुंदर
Samu
1 Nov 2021
गोष्ट लाय भारी होती... थोडी मध्ये बोर झाली पण आवाज खूप मस्त आहे.. मध्ये मध्ये आलेली philosophy पण चांगली आहे.. जरूर ऐका. .. 👍
English
India