अ-लौकिक शांता शेळके
Step into an infinite world of stories
4.8
Biographies
एका आगळ्या समाजपरिवर्तनाच्या प्रयोगाची ही कहाणी मेळघाट म्हणजे सातपुडा पर्वतातील घनदाट अरण्यप्रदेश. येथे तापी-खापरा-सिपना या नद्यांच्या संगमावरचं गाव बैरागड. दारिद्रयानं पोखरलेलं, आजारानं ग्रासलेलं, अज्ञानात पिचलेलं हे छोटं गाव . १९९० च्या आसपास डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे येथे आले. दवाखान्यात औषधोपचार व अवघड बाळंतपणं करायची. पण मनात हेतू गावाच्या सर्वांगीण विकासाचा ! त्यांनी संस्था उभारली नाही. पण प्रबोधनासाठी वेगवेगळ्या वाटा शोधल्या. कधी शिक्षणातून प्रबोधन, कधी उत्सवातून प्रबोधन, तर कधी कोर्टकचेरीचा हिसका दाखवून प्रबोधन. ते शेतीच्या प्रयोगात शिरले. ते धर्मांतराच्या प्रश्नाला भिडले. त्यातून काय घडलं ? हे सांगत आहेत मृणालिनी चितळे
Release date
Ebook: 29 July 2021
English
India