Step into an infinite world of stories
ईश्वर, जीव आणि प्रकृती हे तिन्ही अनादि, अनंत आणि सदा-सर्वकाल आहेत. यापैकी प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्वही आहे. किंबहुना यापैकी एकही नसेल तर विश्वरचना होऊ शकत नाही. ईश्वर सच्चिदानंद आहे. सत् म्हणजे त्याची सत्ता (अस्तित्व ) आहे. चित म्हणजे तो चेतन ज्ञानी आहे. आनंद म्हणजेच निरंतर आनंदमय स्वरूप आहे. जीवात्मा सत् आहे व चितहि आहे. तो कधी दुःखी व कधी सुखी होतो. ईश्वराकडून त्याला आनंद प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. प्रकृती हिची केवळ सत्ता आहे. तिला ज्ञान मुळीच नसल्यामुळे ती निर्जीव आहे. त्यामुळे सुखदुःख भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासच वैदिक त्रैत सिद्धांत हे नाव दिले गेले आहे. या पुस्तकात या तिन्हींच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नोतर रुपाने चर्चा करण्यात आली आहे. सर्व श्रोत्यांना ही माहिती उद्बोधक ठरेल अशी आशा आहे.
प्रायोजक - महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा, परळी, जि. बीड www.mapsabha.in www.thearyasamaj.org www.vedicbooks.com www.onlineved.com www.वेद.com
© 2023 Zankar (Audiobook): 9789389514940
Release date
Audiobook: 8 September 2023
English
India