Step into an infinite world of stories
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे : (१९७९). माधव गुणाजी कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन. १९६९ ते १९७७ या कालखंडातील अनुभव त्यात मांडले आहेत. कोंडविलकर हे चांभार या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीत जन्माला आल्यामुळे जातीयतेचे भयंकर चटके त्यांना सोसावे लागले. आपल्या कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर चार्वाक, भगवान बुद्ध , महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यानपिढ्या जातिभेदाच्या भिंतीत अडकलेल्या आणि भिंती तोडून मुक्त होऊ इच्छिणार्या दलित, कष्टकरी, श्रमिक वर्गाचे दु:ख मुखर केले आहे. मुंबई व कोकणातील दलित व कामगार वर्गाची होरपळ कोंडविलकरांनी आपल्या लेखनातून तीव्रपणे मांडलेली आहे.
माधव कोंडविलकर यांचा जन्म मौजे देवाचे गोठणे (सोगमवाडी) या खेड्यात झाला. कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचे शोषण केले जात होते. कोकणातील या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतून कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन आकाराला आले आहे...
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355444110
Release date
Audiobook: 15 July 2022
English
India